कश्मीरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड, पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी एल्गार

जम्मू-कश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज तीव्र आंदोलन छेडले. मात्र, पोलिसांनी हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांची धरपकड केली. मोदी सरकारच्या इशाऱ्यावरच हे आंदोलन दाबण्याचा पोलिसांनी प्रयत्न केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीनगरच्या दिशेने निघाले होते. भाजपा हाय हाय… मोदी सरकार हाय हाय… अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा मोर्चा निघाला होता. हे मोर्चे पोलिसांनी विविध ठिकाणी बळाचा वापर करून थांबवले. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. श्रीनगर येथील काँग्रेस मुख्यालयाकडे जाण्यापासून सर्व कार्यकर्त्यांना रोखण्यात आले.