अवघ्या तीन दिवसांत चार उंच पर्वत सर

मध्य प्रदेशातील सतना येथील रहिवासी रत्नेश पांडेय यांनी पर्यटनाला प्रोत्साहन आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यासाठी लडाख क्षेत्रातील चार उंच पर्वत अवघ्या तीन दिवसात सर केले. जे चार उंच पर्वत सर केले त्यामध्ये कांगरी ईस्ट (6,108 मीटर उंच), किगर री (6,100 मीटर उंच), यालुंग नोंग 1 (6050 मीटर उंच) आणि यालुंग नोंग 2 (6080 मीटर उंच) यांचा समावेश आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी असतानाही रत्नेश यांनी ही कामगिरी केली.