
एलन मस्क यांनी लॉस एंजेलिसमध्ये एक डायनर, म्हणजेच रेस्टॉरंट उघडले आहे. तिथे चक्क रोबोटच्या हातचे पॉपकॉर्न मिळतात. हुबेहूब अंतराळयानासारखे दिसणारे हे रेस्टॉरंट आहे. डायनरमध्ये बर्गर, हॉट डॉग, चिकन विंग्स असे पदार्थ मिळतात. कार चार्ज करण्यासाठी येथे 80 सुपरचार्जर देखील बसवले आहेत. जर कोणी टेस्ला कारने आला तर तो कारच्या स्क्रीनवरूनच जेवण मागवू शकतो. तसेच, सिनेमासाठी 45 फुटांचा स्क्रीन आहे. मस्क यांनी 2018 मध्ये या आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटची संकल्पना मांडली होती. त्यांनी या नवीन डायनरचा जगभरात विस्तार करण्याची योजना आखली आहे. मस्क यांनी दक्षिण टेक्सासमधील स्टारबेस येथे दुसरे टेस्ला डायनर उघडण्याची घोषणा देखील केली आहे.