मुंबई जीपीओ दोन दिवस बंद राहणार

भारतीय डाक विभागाच्या एपीटी आयटी प्रणालीचा शुभारंभ होत आहे. हे पाऊल म्हणजे डिजिटल उत्कृष्टतेकडे आणि राष्ट्रनिर्मितीकडे वाटचाल करणारा महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे. याचाच भाग म्हणून ही अद्ययावत प्रणाली मुंबई जीपीओमध्ये 4 ऑगस्ट रोजी अंमलात आणली जाणार आहे.

ही प्रगत डिजिटल प्रणाली कार्यरत करण्यासाठी 2 आणि 3 ऑगस्ट रोजी नियोजित डाउनटाइम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे 2 आणि 3 ऑगस्ट  रोजी कोणतेही सार्वजनिक व्यवहार मुंबई जीपीओ कार्यालयांमध्ये होणार नाहीत. डेटा ट्रान्सफर आणि कॉन्फिग्रेशन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी ही तात्पुरती सेवा स्थगित केली आहे.