आरबीआयने जूनमध्ये खरेदी केले 0.2 टन सोने

आरबीआयने जून 2025 मध्ये 0.2 टन सोन्याची खरेदी केलीय. या खरेदीसोबत देशातील सोने आता 879.7 टन झाले आहे. डॉलर आणि विदेशी करन्सीच्या अस्थिरतेदरम्यान आरबीआयने सोन्यावर विश्वास दाखवला आहे. वर्षभरात सोन्याची भागीदारी 8.9 टक्क्यांवरून 12.1 टक्के इतकी झाली आहे. 2025 च्या अवघ्या सहा महिन्यांत सोन्याने 26 टक्के परतावा दिला आहे.