उद्या कोणतेही सूर्यग्रहण दिसणार नाही

प्रसार माध्यमांवर 2 ऑगस्टला सूर्यग्रहण दिसणार असल्याची चर्चा आहे, परंतु 2 ऑगस्टला कोणतेही सूर्यग्रहण दिसणार नाही. सूर्यग्रहणासंबंधी ज्या बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. इस्रो आणि नासाच्या कॅलेंडरनुसार, 2 ऑगस्टला सूर्यग्रहण नाही. ही तारीख खगोलीय घटनेशी जोडलेली नाही. 2025 मधील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च ला लागलेले आहे, तर दुसरे सूर्यग्रहण पुढील महिन्यात 21 सप्टेंबरला दिसणार आहे.