एआयमुळे 40 क्षेत्रांतील नोकऱ्या धोक्यात, मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक अहवाल

एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचा एक धक्कादायक अभ्यास समोर आला आहे. एआयमुळे ज्या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यात अनुवादक, लेखक आणि इतिहासकार यांचा समावेश आहे असे या अहवालात म्हटले आहे. एआयमुळे केवळ दुभाषी आणि अनुवादकांच्याच नव्हे, तर इतर अनेक नोकऱ्यांवरही गंभीर परिणाम होणार आहे. यात इतिहासकार, विक्री प्रतिनिधी आणि अगदी प्रवासी परिचारिका यांसारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. एआय म्हटलं की लोकांना वाटतं, त्यामुळे आयटी, कन्सल्टन्सी, संशोधन आणि लेखन क्षेत्रातील नोकऱ्या संपतील, पण मायक्रोसॉफ्टच्या या संशोधनाने एक वेगळेच चित्र दाखवले आहे.

सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या नोकऱ्या

एआयमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये ग्राहक प्रतिनिधी सर्वात वर आहेत. याशिवाय लेखक, पत्रकार, संपादक, अनुवादक, प्रूफरीडर, वेब डेव्हलपर्स, डेटा सायंटिस्ट, पीआर प्रोफेशनल्स, बिझनेस अ‍ॅनालिस्ट्स, सोशल सायन्स रिसर्च असिस्टंट, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, पॉलिटिकल सायंटिस्ट, सल्लागार, क्लिनिकर डेटा मॅनेजर, पब्लिक रिलेशन स्पेशालिस्ट, कायदेशीर सहाय्यक, मार्केट रिसर्च विश्लेषक, व्यवस्थापन विश्लेषक, विक्री प्रतिनिधी, डेटा सायंटिस्ट, डेटाबेस आर्किटेक्ट, ट्रॅव्हल एजंट.

एआयमुळे कमी प्रभावित होणाऱ्या नोकऱ्या

पंप ऑपरेटर, अग्निशमन पर्यवेक्षक, जलशुद्धीकरण संयंत्र चालक, बांधकाम कामगार, गवंडी, लापूडतोड उपकरणे ऑपरेटर, खाण कामगार, टायर बिल्डर्स, कुंपण बांधणारे, बांधकाम पर्यवेक्षक, उत्खनन यंत्र चालक, ड्रिलिंग मशीन ऑपरेटर, डिशवॉशर, सफाई कामगार, नोकर आणि घरगडी.

मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासाचा एकंदरीत निष्कर्ष असा आहे की, एआय मानवाची जागा घेत नाहीये, तर ते फक्त काम करण्याची पद्धत बदलत आहे. एआय आपल्याला कामाच्या दरम्यान मदत करू शकते. त्यामुळे येणाऱ्या बदलांशी जुळवून घेण्याची आणि एआयबद्दलची आपली समज वाढवण्याची गरज आहे.