
भरधाव ट्रकने 3 ते 4 वाहनांना धडक दिल्याची घटना बदलापूरमध्ये शनिवारी सकाळी घडली. या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला तर 3 ते 4 जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बदलापूरच्या वालीवली गावाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमरास लाद्या वाहून घेणारा ट्रक वालिवली गावाकडून एरंजाडच्या दिशेने भरधाव वेगात चालला होता. यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकने कार, रिक्षासह अन्य तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात कार आणि रिक्षाचा चक्काचूर झाला असून एका महिलेसह रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक झाडावर आदळला.
अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळाहून पलायन केले. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.