रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अमरनाथ यात्रा स्थगित

3 जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा 9 ऑगस्टपर्यंत चालणार होती. परंतु, मुसळधार पावसामुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत 4.90 लाख भाविकांनी अमरनाथ गुहेला भेट दिली. अमरथानकडे जाण्याऱ्या मार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने रस्ते खराब झाले आहेत. बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावर रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे यात्रा थांबवावी लागली. ही यात्रा पुन्हा सुरू करणे शक्य नाही, असे कश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिधुरी यांनी सांगितले.