
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पुणे पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहिर धमकी देण्याचे धाडस कोणताही जबाबदार राजकीय नेता करु शकणार नाही. महारुद्र पाटील हे एक जबाबदार पदाधिकारी असून गेली अनेक वर्षे ते राजकारण तथा समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांना ‘ऑन कॅमेरा’ धमकी देण्याचे धाडस करणाऱ्या कोकाटेंवर गुन्हा दाखल होण्याची गरज आहे. माझी पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण यांना विनंती आहे की कृपया आपण या घटनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे समर्थक हणुमंतराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (@NCPspeaks) इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सत्तेचा पाठिंबा असल्याशिवाय या पद्धतीने सराईतासारखी जाहिर धमकी देण्याचे… pic.twitter.com/8WJJotucwU
— Supriya Sule (@supriya_sule) August 4, 2025