
शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणीच्या गुह्यात एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. राय यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांचे अंधेरी येथे एक प्रोजेक्ट सुरू आहे. 3 जुलैला त्याच्या बांधकामाच्या साईडवर राय आले होते. ते बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करून कारवाईची धमकी दिली होती. तसेच ते बांधकाम सुरू ठेवण्यासाठी 35 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.