भाजपसोबत कुठलीही युती नाही, बसपाच्या अध्यक्ष मायावती यांचे स्पष्टीकरण

भाजपसोबत कुठलीही युती नाही असे स्पष्टीकरण बसपच्या अध्यक्ष मायावती यांनी दिले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा अफवांना बळी पडू नये असेही मायावती यांनी म्हटले आहे.

बहुजन समाज पक्ष हा ना भाजपप्रणित एनडीएमध्ये हा ना काँग्रेसच्या इंडिया आघाडीसोबत. आमचा पक्ष सर्व जातीयवादी आघाड्यांपासून वेगळा राहून ‘बहुजन हिताय व बहुजन सुखाय’ या आंबेडकरवादी तत्वज्ञान व नीतीनुसार काम करतोय. तरीदेखील, विशेषतः दलित, आदिवासी आणि अन्य मागासवर्गीयांविरोधी व जातीयवादी मानसिकता असलेले काही माध्यमं बसपची प्रतिमा वेळोवेळी खराब करण्याचा आणि पक्षाला राजकीय नुकसान पोहोचवण्याची कोणतीही संधी गमावत नाहीये. त्यामुळे पक्षाला आपल्या लोकांना अशा गोष्टींबाबत सातत्याने सतर्क ठेवण्याची गरज भासत असते.

याच संदर्भात, नुकतंच ‘भारत समाचार’ या यूट्यूब चॅनलने “बीजेपी के साथ आ गयी मायावती कर दिया बड़ा ऐलान?” या मथळ्याखाली एक चुकीची, तथ्यहीन आणि विषारी बातमी प्रसारित केली आहे. प्रत्यक्षात त्या बातमीच्या आत वेगळाच मजकूर आहे.

भारत समाचार चॅनलने पक्षाच्या प्रतिमेला, विशेषतः निवडणुकीपूर्वी, नुकसान पोहोचवण्यासाठी जे हे नीच आणि घृणास्पद पाऊल उचलले आहे, त्याची जितकीही निंदा आणि निर्भत्सनाकेली जावी, ती अपुरीच ठरेल. या चॅनलने यासाठी माफी मागणे आवश्यक आहे असे मायावती म्हणाल्या.

तसेच पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना खास विनंती आहे की, अशा प्रकारच्या राजकीय कारस्थानी आणि जातीयवादी माध्यमांच्या घृणास्पद डावपेचांपासून नेहमी सावध राहावे. हे जातीयवादी घटक आपल्या आंबेडकरवादी चळवळीला कमकुवत करण्यासाठी नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात षड्यंत्र रचत असतात असेही मायावती म्हणाल्या.