
मंगळवारी शेअर बाजार घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 308 अंकांनी घसरून 80,710 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 73 अंक घसरून 24,649 अंकांवर बंद झाला. अदानी पोर्टस्, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, इंटरनल, बीईएल, एचडीएफसी बँक, पावर ग्रीड, आयटीसी आणि सन फार्मास्युटिकलच्या शेअर्समध्ये घसरण झाली.