
पाटणा
बिहारच्या पाटणामधील मुसळधार पावसामुळे पुराचे संकट आणखी गडद झाले आहे. गंगामाईने रौद्ररूप धारण केले आहे. पाटणातील दाणापूरमध्ये प्रशासनाकडून पूरग्रस्त पीडितांसाठी दोन डझनहून अधिक बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये गंगा नदीला आलेल्या पुरामुळे येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरांसह सरकारी कार्यालयात पुराचे पाणी घुसले आहे. वाराणसीमध्ये 1 लाखांहून अधिक लोकांना फटका बसला आहे.
प्रयागराज
गंगा आणि यमुना नदीचे पाणी प्रयागराजमध्ये शिरल्याने शेकडो घरे पाण्यात गेली आहेत. पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी 133 बोटी चालवल्या गेल्या. पुरामुळे 65 ते 70 हजार लोक बेघर झाले आहेत.