
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने तीन नवीन आणि दमदार फिचर्स आणले आहेत. ‘रिपोस्ट’, ‘इंस्टाग्राम मॅप’ आणि रिल्समधील ‘फ्रेंड्स टॅब’ या फिचर्समुळे आता इन्स्टाग्राम वापरण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक वैयक्तिक आणि मनोरंजक होणार आहे. एन्स्टाग्रामवर ‘रिपोस्ट’ पर्यायाद्वारे मित्रांच्या किंवा आवडत्या क्रिएटर्सच्या रिल्स आणि पोस्टस् शेअर करता येणार आहेत. ‘एन्स्टाग्राम मॅप’ या नव्या फिचरमुळे तुम्ही निवडक मित्रांसोबत आपले लोकेशन शेअर करू शकाल, पण यावर तुमचंच पूर्णपणे नियंत्रण असणार आहे. रिल्स सेक्शनमध्ये आता ‘फ्रेंड्स’ नावाचा एक नवीन टॅब दिसेल, जिथे तुमचे मित्र काय पाहत आहेत, लाईक करत आहेत हे कळेल.
आवडीच्या पोस्टस् शेअर करा
‘रिपोस्ट’ फिचर अखेर इन्स्टाग्रामने सादर केले आहे. याच्या मदतीने तुम्ही सार्वजनिक रिल्स आणि फिड पोस्टस तुमच्या मित्रांसोबत आणि फॉलोअर्ससोबत शेअर करू शकता.
मित्रांच्या लोकेशनसोबत राहा अपडेटेड
‘इन्स्टाग्राम मॅप’ हे फिचर सुरक्षित आणि युजर्सच्या नियंत्रणात राहणारे आहे. हे फिचर पूर्णपणे ‘ऑप्ट-इन’ आहे, म्हणजेच तुम्ही चालू केल्याशिवाय तुमचे लोकेशन कोणालाही दिसणार नाही. तुम्ही कोणासोबत लोकेशन शेअर करायचे आहे हे ठरवू शकता आणि कधीही ते बंद करू शकता. पालकांना मुलांच्या लोकेशन शेअरिंगवर नियंत्रण ठेवता येईल होईल.
फ्रेंडस् टॅब ः रिल्स स्क्रोल करताना आता तुम्हाला एक नवीन ‘फ्रेंड्स’ टॅब दिसेल. या टॅबमध्ये तुमच्या मित्रांनी लाईक, कमेंट किंवा रिपोस्ट केलेले कंटेंट दिसेल.