
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्यानंतर कंपनीने आता उरलेल्या कर्मचाऱ्यांची घसघशीत पगारवाढ केली आहे. या पगारवाढीचा फायदा कनिष्ठ आणि मध्यम स्तरांवरील 80 टक्के कर्मचाऱ्यांना होणार आहे. कर्मचाऱ्यांना किती टक्के पगारवाढ झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पगारवाढ येत्या 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून पगारवाढीची माहिती दिली आहे. आपण सर्वजण मिळून टीसीएसचे भवितव्य घडवत आहोत. कंपनीबद्दल कर्मचाऱ्यांनी जे समर्पण दाखवले आहे, त्याबद्दल कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार मानत आहे, असे कंपनीने आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.