
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे पाकिस्तानसाठी पयघड्या घातल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर दुसऱ्यांदा पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी ते जूनमध्ये पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा दौरा आहे. या दौऱ्यात दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय करार होण्याची शक्यता आहे.
अमेरिकन सैन्याचे जनरल आणि युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर मायकल कुरीला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी असीम मुनीर अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. कुरीला यांनी आपल्या कार्यकाळात दहशवादाशी लढण्यासाठी पाकिस्तानची मदत घेतली होती.