असं झालं तर… आधारकार्डवर पत्ता चुकीचा असेल

नवीन आधारकार्ड काढताना पत्ता चुकीचा पडला असेल तर तो बदलता येऊ शकतो. यासाठी काही नियम आहेत, ते जाणून घ्या.

पत्ता ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पद्धतीने बदलता येऊ शकतो. ऑनलाईनसाठी वेबसाईटला, तर ऑफलाईनसाठी आधार नोंदणी कार्यालयाला भेट द्या.

पत्ता बदलण्यासाठी आधार अपडेट किंवा करेक्शन फॉर्म भरणे गरजेचे आहे. तसेच यासाठी आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अर्जाची पावती घ्या. स्टेट्स तपासण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. ऑनलाईन अपडेटसाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागेल.

ऑफलाईन अपडेटसाठीही शुल्क द्यावे लागते. पत्ता बदलण्यासाठी तुमच्याकडे वैध पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे तरच पत्ता बदलता येईल.