
श्रीलंकेचा माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू सलिया समनला भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी न्यायाधिकरणाने पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निलंबित केले आहे. समन हा त्या आठ जणांपैकी एक आहे, ज्यांच्यावर सप्टेंबर 2023 मध्ये अमिरात क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हे आरोप 2021 मधील अबूधाबी टी-10 क्रिकेट लीगदरम्यान सामने किंवा स्पॉट फिक्सिंग करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित होते. ही कारवाई ईसीबीच्या संहितेनुसार नियुक्त भ्रष्टाचारविरोधी अधिकारी यांच्या हस्तक्षेपामुळे उधळली गेली होती.संपूर्ण सुनावणी आणि दोन्ही बाजूंच्या युक्तिवादांनंतर न्यायाधिकरणाने समनला संहितेच्या अनुच्छेद 2.1.1 नुसार सामने फिक्स करण्याचा, कटकारस्थान करण्याचा किंवा बेकायदेशीर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवले.