
हिंदुस्थानच्या पुरुष राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यानंतर खालिद जमील यांच्या पहिल्याच प्रशिक्षण शिबिरात आघाडीचा अनुभवी खेळाडू सुनील छेत्रीची अनुपस्थिती जाणवणार आहे. आगामी सीएएफए नेशन्स कपमधील पहिल्यावहिल्या सहभागापूर्वी 22 खेळाडूंनी बंगळुरूमधील शिबिरात हजेरी लावली असून, यात आणखी 13 जणांची भर पडेल. दरम्यान, माजी प्रशिक्षक मनोलो मार्वैझ यांच्या संघातून वगळण्यात आलेला अनुभवी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.
खालिद जमील यांच्या पहिल्या शिबिरासाठी निवडण्यात आलेले खेळाडू
गोलरक्षक ः अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, हृतिक तिवारी.
संरक्षक ः आकाश मिश्रा, अॅलेक्स साजी, बोरिस सिंग थंगजम, चिंगलेनसाना सिंग कोनशाम, हमिंगथानमाविया रालटे, राहुल भेके, रोशन सिंग नाओरम, सदेश झिनगन, सुनील बेंचामिन.
मध्यरक्षक ः आशिक कुरुनियन, दानिश फारूक भट, निखिल प्रभू, राहुल कनोली प्रविण, सुरेश सिंग वांगजाम, उदांता सिंग कुमाम.
आक्रमक ः इरफान यादवाड, लालियानझुआला छंगटे, रहीम अली, विक्रम प्रताप सिंग.