‘आरे’चे स्टॉल्स अजूनही सुरू कसे? हायकोर्टाने महापालिकेकडून मागवले उत्तर

‘आरे’ला 2014 मध्ये टाळे लागले. 2022 मध्ये अन्य आस्थापने बंद झाली तरीही आरेचे स्टॉल्स मुंबईत कसे सुरू आहेत? महापालिकेच्या जागेवर हे स्टॉल्स असून यांच्या परवान्यांचे प्रशासनाने नूतनीकरण केलेच कसे, असे प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केले.

न्या. गिरीश पुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने आरेच्या स्टॉल्समध्ये दुग्धव्यतिरिक्त सुरू असलेल्या अन्य पदार्थांच्या विक्रीवरही आश्चर्य व्यक्त केले. ही परवानगी दिली कोणी? येथे गॅस पेटवला जातो. हे धोकादायक आहे. पालिकेने याचे उत्तर द्यावे. आम्हाला योग्य ती माहिती मिळावी यासाठी अम्याकस क्युरी म्हणून अॅड. रश्मिन खांडेकर काम पाहतील, असे सांगत कोर्टाने सुनावणी तहपूब केली.

एक रुपयात महानंदला स्टॉल्स

आरेचे स्टॉल्स एक रुपया वार्षिक शुल्काने महानंदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे सर्व रंजक आहे, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.