
किचन ट्रॉलीची स्वच्छ करण्यासाठी आधी ड्रॉव्हर्स काढून घ्या. यामुळे ट्रॉली नीट स्वच्छ करता येईल. ट्रॉलीला लागलेली घाण, धूळ साफ करण्यासाठी बेकिंग सोडाचा वापर करा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांची पेस्ट करा. ही पेस्ट ट्रॉलीला लावून काही वेळाने कपडय़ाने पुसून घ्या.
nअन्नपदार्थ गरम राहण्यासाठी अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला जातो. अॅल्युमिनियम फॉईल कोका कोलामध्ये भिजवत ठेवा. मग त्याचा वापर करून ट्रॉली स्वच्छ करा. व्हिनेगरदेखील सफाईसाठी उपयुक्त आहे. किचन ट्रॉलीचा जंग व्हिनेगर वापरून काढू शकता. थोडे व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र करा. हे मिश्रण चांगले काम करेल.