काँग्रेसच्या नेत्यांना प्रदेश कार्यालयात नियमित हजेरीची सक्ती

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपने महाराष्ट्रात केलेली मतचोरी पुराव्यासह उघड केल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अधिक सतर्क आणि सक्रिय झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाला अधिक जनताभिमुख करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार वरिष्ठ नेत्यांना जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रदेश कार्यालयात नियमित हजेरी लावावी लागणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सपकाळ यांनी युवा कार्यकर्त्यांची फौज रस्त्यावर उतरवण्यासाठी सज्ज केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार कार्यकर्त्यांनी आतापासून मतदार याद्यांची तपासणी सुरू केली आहे. भाजपच्या हालचालींवरही या कार्यकर्त्यांची बारीक नजर आहे.