
कोकणात गेल्या आठवडाभरापासून पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. नदी नाल्यांना महापूर आल्याने पूरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मांडुकली दरम्यान रस्त्यावर पाणी आल्याने हा मार्ग ठप्प झाला आहे.
गेल्या सात दिवसापासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धो-धो पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे गगनबावाडादरम्यान मांडुकली, किरवे, लोंघे येथे सोमवारी मध्यरात्रीपासून रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे.