
मुंबईत तब्बल 30 मिमी पाऊस पडला असून राज्यात NDRF आणि SDRF अलर्टवर आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे असेही फडणवीस यांनी सांगितले.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. साधारणपणे गेल्या तीन चार दिवसातल्या सगळ्या अतिवृष्टीमध्ये जवळपास 12 ते 14 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी त्याच्यावरची पिक जी आहेत ती बाधित झालेली आहेत. काही प्रमाणात जनावरांचे नुकसान झालेल आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग फूटफुटी सदृश परिस्थिती झाली. त्याच्यामध्ये आठ लोकांचा जवळपास मृत्यू झालेला आहे एकूण परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून काही भागांमध्ये जवळपास 300 मिमी पर्यंतची अतिवृष्टी झालेली आहे. काही ठिकाणी पाणी साठलं आहे. लोकल वाहतूक थोडी धीमी झालेली आहे काही ठिकाणी उशिराने धावत आहे. पाणी हळूहळू कमी होतंय. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून चार पाच लोकांना तिथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
तसेच राज्यात एनडीआरएफ एसडीआरएफला तैनात असून अलर्टवर ठेवलेलं आहे. बहुतांश नद्या इशारा पातळीवर आहेत. काही नद्या इशारा पातळीच्यावर चाललेल्या आहेत. आपल्या बाजूच्या राज्यांसोबत आपलं नीट संपर्क आहे. त्यामुळे जो काही विसर्ग आहे त्याचं मॅनेजमेंट त्या राज्यांसोबत करावं लागतं. ते मॅनेजमेंट आपण चांगल्या पद्धतीने करतो आहोत असे फडणवीस म्हणाले.
महासागराचा पूर्वी जो भाग आहे याच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आहे. बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये एक लो प्रेशर बेल्ट तयार झालेला आणि जोपर्यंत लो प्रेशर बेल्ट आहे तोपर्यंत अतिवृष्टी संभावित आहे. आणि म्हणूनच इकडे रेड अलर्ट दिलेला आहे. रेड अलर्ट प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे काही अडचणी या निर्माण होतायत. कारण आपलं सगळं जे काही डिझाईन असतं हे नॉर्मल प्लस 10 टक्केच असतं. पण ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस काही काळ डिसरपशन्स निर्माण होतात ते डिसरपशन्स कसे दूर करायचे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतो. आणि म्हणूनच आपण यावेळी दर दर तीन तासांनी लोकांना अलर्ट देतो की कुठे पाऊस पडणार आहे किती पाऊस पडणार आहे काय केलं पाहिजे.
जिथे जनावरांचं, घरांचं नुकसान झालं आहे किंवा दुर्दैवाने मृत्यू झालेले आहे, त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात. त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुणे पद्धतीने विड्रॉ करण्याचे अधिकारी दिले आहेत. शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्या संदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल असेही फडणवीस म्हणाले.