
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मास्यूटिकल्स कंपनीत आज दुपारी भीषण वायुगळती झाली. या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्र. एफ-13वरील या कंपनीत दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास एलबेंडोझोल या उत्पादनावर प्रक्रिया सुरू असताना अचानक वायुगळती झाली. त्यामुळे कारखान्यातील सहा कामगार जखमी झाले. त्यांना बोईसर येथील शिंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत कामगारांमध्ये कमलेश यादव, कल्पेश राऊत, धीरज प्रजापती आणि बंगाली ठाकूर या चार कामगारांचा समावेश आहे. तर रोहन शिंदे आणि नीलेश हाडळ यांची प्रकृती चिंताजनक आहे.