गणेशोत्सवात इंदापूर-माणगावमध्ये वाहतूककोंडीचे विघ्न, बायपास मार्ग मार्च 2026मध्ये पूर्ण होणार

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठीचे काम सुरू असले तरी पावसामुळे खड्डे कामात अडथळे निर्माण होत आहेत. इंदापूर-माणगाव शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी बायपासची योजना आहे. पण कंत्राटदाराने काम अर्धवट टाकल्याने आता नवीन कंत्राटदार नेमला आहे. आता बायपासचे काम मार्च 2026मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे या वर्षीही गणेशोत्सवात इंदापूर-माणगावमध्ये वाहतूककोंडी होणार आहे.

गणेशोत्सवापूर्वीच्या तयारीच्या दृष्टीने मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचे सादरीकरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे करण्यात आले. पण अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत.

चिपळुणात वाहतूक कोंडी

चिपळूण येथील बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाचे काम डिसेंबर 2025पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सध्या या पुलाचे काम चाळीस टक्के अपूर्ण आहे. या पुलाचे काम पंत्राटदार स्वखर्चाने करीत आहे.