अनिल अंबानींच्या घरावर सीबीआयचा छापा, 17 हजार कोटींच्या बँक फसवणुकीचा आरोप

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कफ परेडच्या सी विंड येथील घरावर सीबीआयने शनिवारी छापा टाकला. सकाळी 7 वाजताच सीबीआयचे अधिकारी अंबानी यांच्या घरावर धडकले. यावेळी अनिल अंबानी व त्यांचे पुटुंबीय घरी होते.

सीबीआयचे सात ते आठ अधिकारी घराची झडती घेत होते. तब्बल 17 हजार कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात अंबानी यांच्या पंपन्यांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली होती. 5 ऑगस्टला ईडीने त्यांची दहा तास चौकशीही केली होती.