पनवेल ते चिपळूण 6 अनारक्षित ट्रेन धावणार

प्रातिनिधीक - फोटो

मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी पनवेल आणि चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित गणपती विशेष रेल्वे सेवांची घोषणा केली आहे. 01159 अनारक्षित विशेष ट्रेन पनवेल येथून 5, 6 आणि 7 सप्टेंबर रोजी 4.40 वाजता सुटेल व चिपळूण येथे त्याच दिवशी 9.55 वाजता पोहोचेल. 01160 अनारक्षित विशेष ट्रेन चिपळूण येथून 5, 6 आणि 7 सप्टेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता सुटेल. तसेच पनवेल येथे त्याच दिवशी 16.10 वाजता पोहोचेल. या गाडय़ांना सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगांव रोड, वीर, सापेवामने, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी या स्थानकांवर थांबा असणार आहे.