
दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिला आहे. यातच माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, “आज आणि उद्या असे दोन दिवस अजूनही सरकारच्या हातात आहे. आम्हाला मुंबईला यायचं नाही. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केल्यानंतर आम्ही मुंबईला येऊन काय करणार. देवेंद्र फडणवीस यांना अजूनही संधी आहे. त्यांनी संधीचं सोनं करावं.”
ते म्हणाले, मी जर एका 27 तारखेला अंतरवाली सोडली तर, मग मी मंत्री किंवा कोणाचेच ऐकणार नाही. त्यांच्या लक्षात आलं आहे की, मराठी आणि कुणबी जीआर काढायला एकच आधार काढायला पाहिजे, असं ते म्हणाले होते. 58 लाख नोंदींचा आधार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग आता का आरक्षण देत नाही? असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आहे.





























































