
हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणखी वाढली असून नौदलाच्या ताफ्यात उदयगिरी (एफ35) आणि हिमगिरी (एफ34) या दोन अत्याधुनिक स्टील्थ युद्धनौका सामील झाल्या आहेत. देशातील दोन प्रमुख शिपयार्ड्समध्ये या नौदांची बांधणी करण्यात आली असून या दोन्ही युद्धनौका एकाच वेळी कार्यरत होणार आहेत.
उदयगिरी ही युद्धनौका मुबंईतील माझगांव डॉक शिपबिल्डर्सने बांधली असून हिमगिरी ही युद्धनौका कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्सने तयार केली आहे. विशेष म्हणजे उदयगिरी हे नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोचे 100 वे डिझाईन केलेले जहाज आहे. याचे वजन सुनारे 6 हजार 670 टन आहे. या युद्धनौकांमध्ये सुपरसॉनिक जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रे, मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, 76 मिमी एमआर तोफा, 30मिमी आणि 12.7 मिमी क्लोज-इन वेपन सिस्टीम आणि अँटी सबमरीन/ अंडरवॉटर वेपन सिस्टीम यांचा समावेश आहे.





























































