
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बोहारमधील ‘मतदार हक्क यात्रेत’ आज काँग्रेस खासदार प्रियांका गांधी सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “ज्या पक्षाने जनतेचा विश्वास गमावला, ते आता मतचोरी करून सत्तेत आहेत,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.
सुपौल येथे बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत की, भाजपने लोकांचा विश्वास गमावला आहे. आता ते मते चोरून सत्तेत राहू इच्छितात. त्या म्हणाल्या की, एसआयआरच्या नावाखाली लाखो लोकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्या म्हणाल्या, आम्ही गरिबांचा एकही मत चोरू देणार नाही.
तर यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “एनडीएविरुद्धच्या लढाईत आपण सर्वजण एक आहोत आणि निकाल फलदायी ठरतील. आम्ही निवडणूक आयोगाला भाजपच्या इशाऱ्यावर काम करू देणार नाही आणि बिहारमध्ये कोणताही खरा मतदार वगळला जाणार नाही याची खात्री करू.” दरम्यान, राहुल गांधींची ही १६ दिवसांची यात्रा १ सप्टेंबर रोजी पाटण्यातील एका मोठ्या रॅलीने संपेल.