लालबागच्या राजाच्या दरबारी अवयवदानाबाबत जागरूकता

यंदाच्या गणेशोत्सवात ‘लालबागच्या राजा’च्या दरबारी अवयवदानाबाबत जनजागृती केली जाणार आहे. लालबागचा राजा मंडळ व परळच्या ग्लेनईगल्स हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने अवयवदानाची विशेष चळवळ हाती घेतली आहे. यासाठी ‘लालबागचा राजा’ मंडळात एक विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेले रुग्ण आणि उपलब्ध दात्यांमध्ये तफावत आहे. जागरूकतेचा अभाव आणि अवयवदानाबाबत संकोच बाळगल्याने प्रमुख अडथळे येत आहेत. गणेशोत्सवात भक्तांना प्रेरणा देऊन ही दरी भरून काढणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे ग्लेनईगल्स हॉस्पिटलचे सीईओ डॉ. बिपिन चेवले यांनी सांगितले.