
Asia Cup 2025 मध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना आज UAE विरुद्ध खेळणार आहे. दुबईमध्ये उभय संघांमध्ये रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. शुभमन गिल 12 वर्षांचा असताना त्याच्यासोबत सराव केलेला आणि सध्या UAE संघाचा फिरकीपटू असलेला सिमरनजीत सिंह सुद्धा खेळणार आहे.
सिमरनजीत सिंह हा मुळ पंजाबचा आहे. परंतु आता तो UAE देशाचं प्रतिनिधीत्व करत आहे. मोहालीच्या PCA अॅकेडमीमध्ये शुभमन गिल आणि सिमरनजीत सिंह यांनी एकत्र सराव केल्याचे PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सिमरनजीतने सांगितले आहे. त्याने सांगितले की, ही गोष्ट 2011-12 ची आहे. तेव्हा शुभमन गिल 11-12 वर्षांचा होता आणि वडिलांसोबत मोहालीला येत असे. आम्ही सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सराव करायचो. त्यानंतर शुभमन गिल नेटमध्ये फलंदाजीचा सराव करायचा, तेव्हा मी त्याला अनेकदा त्याच्यासाठी गोलंदाजी केली आहे. परंतु आज तो मला ओळखेल की नाही हे माहित नाही, परंतु मी त्याला लहानपणापासून ओळखत आहे.
निर्णायक युद्धापूर्वी हिंदुस्थानची तयारी, यूएईविरुद्ध प्रयोग करण्याची हिंदुस्थानला संधी
सिमरनजीत सिंहने मोहालीमध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा त्याने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे 2017 साली रणजीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीमध्येही त्याचं नाव होतं. तसेच पंजाब किंग्ज संघासाठी नेटमध्येही त्याने गोलंदाजी केली आहे. परंतु टीम इंडियाच्या संघात त्याला स्थान मिळवता आले नाही. अशातच त्याला 2021 साली दुबई प्रॅक्टीस कॅम्पची ऑफर मिळाली आणि त्याच्या आयुष्याला सुद्धा कलाटणी मिळाली. सिमरनजीत सिंह सध्याच्या घडीला UAE संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. 35 वर्षीय सिमरनजीतने आतापर्यंत 12 टी-20 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत.