सर्व एक्सप्लोझिव्ह कंपन्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करा, अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बाजारगाव परिसरात मोठय़ा प्रमाणात एक्सप्लोझिव्ह कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये वारंवार होत असलेल्या स्फोटामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटना घडली की थातूरमातूर चौकशी होते, परंतु यावर ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. त्यामुळेच स्फोटाच्या घटनांमध्ये  वाढ होत आहे. हे लक्षात घेता सर्व एक्सप्लोझिव्ह कंपन्यांचे सेफ्टी ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्य व केंद्र सरकारने सेफ्टी ऑडिट करण्यासाठी एक तज्ञ समिती तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारने पेंद्राकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी  अनिल देशमुख यांनी केली आहे. या पत्राची प्रत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्यासह एक्सप्लोझिव्ह कंपन्यांमधील कामगारांच्या सुरक्षा तपासणीची जबाबदारी असलेल्या पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेअंतर्गत येत असलेल्या अग्नी, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना देण्यात आल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

या कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट महत्त्वाचे

सोलार एक्सप्लोझिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड, इकॉनॉमिक्स एक्सप्लोझिव्ह कंपनी, केलटेक एक्सप्लोझिव्ह, चामुंडी एक्सप्लोझिव्ह, डिफेन्स एक्सप्लोझिव्ह, ओरिएंटेड एक्सप्लोझिव्ह, एशियन फायर वर्क, सोलर एक्सप्लोझिव्ह, एस.बी.एल. एक्सप्लोझिव्ह, अमिनो एक्सप्लोझिव्ह या कंपन्यांचे सुरक्षा ऑडिट करण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.  दरम्यान, कंपन्यांमधील स्पह्टांमध्ये गेल्या दोन वर्षांत जवळपास 23 कामगारांचा मृत्यू झाला आहे.