
हिंदुस्थानची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी हिचा जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत व्यक्तिगत गटातही पराभव झाला. मात्र, 15 वर्षीय गाथा खडके हिने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून या मोसमातील हिंदुस्थानची एकमेव रिकर्व्ह तिरंदाज म्हणून नावलौकिक मिळवला. सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळणाऱ्या दीपिकाला अंतिम 32 मध्ये इंडोनेशियाच्या दियानंदा चोइरुनिसाने 5 सेटच्या थरारक द्वंद्वात 6-4 फरकाने हरवले. मात्र, 14 व्या मानांकित गाथाने तिसऱ्या फेरीत आठव्या मानांकित जर्मनीच्या ऑलिम्पियन मिशेल क्रॉपेन बाऊर हिला 6-4 फरकाने हरवून आगेकूच केली.