कोणत्याही पदासाठी विचार नाही, बीसीसीआय अध्यक्षपदाच्या अफवांना सचिनकडून पूर्णविराम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह संचारला होता; मात्र आज खुद्द सचिननेच या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या अफवांना अखेर पूर्णविराम मिळाला. मी बीसीसीआय अध्यक्ष होतोय ही केवळ अफवा आहे. अशा कोणत्याही पदासाठी माझा विचार नसल्याची भूमिका सचिननेच स्वतः स्पष्ट केली.

गेले काही दिवस बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी अचानक सचिन तेंडुलकरचे नाव आल्याने आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र सचिनने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देताना चाहत्यांना आवाहन केले की, कृपया अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. माझे लक्ष क्रिकेटच्या विकासासाठी इतर प्रकल्पांवर आहे.

सचिनच्या अध्यक्षपदाच्या चर्चेनंतर क्रिकेटविश्वात निर्माण झालेली उत्सुकता सचिनच्या या विधानामुळे संपुष्टात आली आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या झालेल्या वार्षिक बैठकीत विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी वयाची सत्तरी गाठल्यामुळे पदमुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून बिन्नी यांच्या जागी महान फलंदाज येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते आणि हे नाव सचिन तेंडुलकर होते. येत्या 28 सप्टेंबरला बीसीसीआयची बैठक असून त्यात नव्या अध्यक्षपदाच्या नावाचा फैसला होईल.

कुलदीप हिंदुस्थानच्या टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात महत्त्वाचा घटक राहिला आहे. तरीसुद्धा कसोटी संघात त्याला जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांसारख्या अष्टपैलू फिरकीविरुद्ध नेहमीच स्पर्धा करावी लागते. त्यामुळे सातत्याने संघात स्थान मिळवणे त्याच्यासाठी कठीण ठरते.