
राज्य सरकारने नागरिकांना कोणत्या सेवांची आणि योजनांची निकड आहे, याचा अभ्यास केला आहे. आता त्या शासकीय सेवा आपण डिजिटल पद्धतीनं देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नागरिकांना शासकीय सेवा आता व्हॉट्सऍपवर मिळणार आहेत. त्यासाठी आपण समग्र नावाच्या संस्थेशी करार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तेव्हा सेवा हमी कायदा केला होता. आपले सरकारचे व्हर्जन जुने झाले असून लवकरच नव्हे व्हर्जन येईल. यामुळे लोकांना डिजिटल तसेच व्हॉट्सऍपवरदेखील सेवा उपलब्ध होतील. असे फडणवीस म्हणाले.