
‘लालबागचा राजा’च्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव गुरुवारी करण्यात आला. लिलावात तब्बल 108 वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यातून 1 कोटी 65 लाख 71 हजार रुपये जमा झाले आहेत. 10 तोळय़ाच्या सोन्याच्या बिस्किटाची 11 लाख 31 हजार रुपयांना तर साडेपाच तोळय़ाचा सोन्याचा हाराची 5 लाख 62 हजार रुपयांना विक्री झाली.