
भूस्खलनानंतर अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेली जम्मू येथील माता वैष्णोदेवी यात्रा येत्या 14 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. माता वैष्णोदेवी ट्रस्टकडून ही माहिती देण्यात आली आहे. जम्मू-कश्मीरमधील रियासी जिह्यातील माता वैष्णोदेवी मंदिराची यात्रा आज, शुक्रवारी सलग 18 व्या दिवशी स्थगित करण्यात आली आहे. 26 ऑगस्ट रोजी कटरा येथील त्रिपुटा टेकडय़ांमधील अधपुंवारी येथे ढगफुटीमुळे मोठी दुर्घटना घडली. भूस्खलनात 34 यात्रेकरूंचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले होते. भूस्खलनानंतर गुहा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.