
पंजाबमध्ये आलेल्या पुराचा फटका हजारो पुटुंबांना बसला आहे. पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीला बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान धावून आला आहे. व्हाईस ऑफ अमृतसरच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मदतकार्यासाठी शाहरुख खानची मीर फाऊंडेशन सहभागी झाली आहे. शाहरुखच्या संस्थेने 1,500 पुटुंबांना आवश्यक मदतीचे वाटप केले आहे. यामध्ये अमृतसर, पतियाला, फजिल्का, फिरोजपूर जिह्यांतील पूरग्रस्तांचा समावेश आहे. या पूरग्रस्तांना घरगुती आवश्यक वस्तू, गॅस स्टोव्ह, पंखे, जल शुद्धीकरण मशीन, चटईसह अन्य काही वस्तूंचा समावेश आहे. शाहरुखच्या आदी व्हाईस ऑफ अमृतसरने एम्स, नवी दिल्ली डॉक्टरच्या मदतीने गुरुद्वारा बाबा बुद्धा साहिब, गाव घनोवाला या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावले आहेत.