सफर-ए-यूएई – बांगलादेश वि. श्रीलंका  सामना अटीतटीचा होणार 

>>संजय कऱहाडे

व्वा! आशिया कप स्पर्धा सुरू झाल्यानंतर आज प्रथमच चुरशीचा सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंका आणि बांगलादेश दोन्ही संघ तुल्यबळ दिसतायत. बांगलादेशने परवाच टिंगटाँग, सॉरी, हाँगकाँगला पाणी पाजलं. पण केवळ 143 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची स्थिती 2 बाद 47 झाल्यावर त्यांची घंटी वाजते की काय या प्रश्नाने मन किंचित बावरून गेलं होतं. लिटन दासने मस्त फलंदाजी केली. हृधोयला साथीला घेऊन नैया पार नेली. ध्येय, संयम, एक-दोन धावांचं महत्त्व आणि हिशेबी फलंदाजी याचा जणू त्याने धडाच घालून दिला. त्याचं अर्धशतक सामनावीराला साजेसं होतं.

तांझिम, मुशफिपुर अन् जॅकेरने घेतलेले झेल अवाक करणारे होते. त्याचप्रमाणे गोलंदाज तांझिम, मुशफिपुर आणि रिषाद चमपून गेले. एपूण, कामगिरी चतुरस्र!

अर्थात, ही कामगिरी कमपुवत संघाविरुद्ध केलेली असली तरी त्यातून बांगलादेश संघाची पुवत पाहायला मिळाली. झगडण्याची वृत्ती त्यांनी दाखवली. श्रीलंकेचा संघ टिंगटाँग संघापेक्षा नक्कीच अधिक सक्षम आहे. म्हणूनच आजची लढत तुल्यबळ म्हणता येते. कागदावरच पाहा. गेल्या दहा वर्षांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध अठरा सामने खेळलेत. त्यापैकी दहा श्रीलंका तर सात सामने बांगलादेशने जिंकलेले आहेत. आणि एक निर्णयविरक्त.

श्रीलंकेचं नेतृत्त्व चरित असलेंका करतोय. अनुभवी वानिंदु हसरंगाशिवाय निसंका, पुशल परेरा आणि मेंडीस फॉर्मात आहेत. अष्टपैलू शनाका अन् वेलागे आहेत आणि फिरकीबहाद्दर हसरंगा, तीक्षनासुद्धा आहेत. वेगवान पाथीराणा अन् चामिरासुद्धा उत्पंठा वाढवू शकतात.

आता टॉस कोण जिंकतो आणि दडपणाचा सामना पुठला संघ धैर्याने कसा करतो हेच पाहायचं. झायेद स्टेडियमचा स्वभाव आपण पाहिलेला आहे. प्रथम फलंदाजी घेऊन अफगाणिस्तानने विजयाची नांदी केली होती.

आजच्या सामन्यात श्रीलंकेचा सिंह वरचढ ठरतो की बंगालचा वाघ डरकाळी पह्डतो एवढंच बघायचं!