
यश राठोडच्या नाबाद 137 धावा, कर्णधार रजत पाटीदारची शतकी खेळी (101 धावा) आणि दानिश मालेवारचे अर्धशतक (53 धावा) यांच्या जोरावर मध्य विभागाने दुलीप करंडक अंतिम सामन्यात दुसऱ्या दिवशी 5 बाद 384 अशी भक्कम धावसंख्या उभारली आणि दुलीप करंडकावर आपली पकडही घट्ट केली. दक्षिण विभागाला 149 धावांत गुंडाळल्यानंत् ार दिवसअखेर 235 धावांची जबरदस्त आघाडी घेत मध्य विभागाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
डावाची घडी बसवणारी भागीदारी
गुरुवारच्या 50 धावांवरून खेळ पुढे नेणाऱ्या मध्य विभागाला सकाळी वासुकी काwशिकने अक्षय वाडकरला(22) बाद करून पहिला धक्का दिला. त्यानंतर गुरजपनीत सिंगने शुभम शर्मा (6) आणि दानिश मालेवार (53) यांना बाद केले, मात्र यानंतर पाटीदार-राठोड जोडीने मध्य विभागाचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी रचून संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. अखेर गुरजपनीत सिंगने पाटीदारला माघारी पाठवले. लगेचच उकेंद्र यादव (5) एम.डी. निधीषकडून बळी ठरला.
राठोडची भक्कम खेळी
समोर विकेट पडले तरी राठोड ठामपणे उभा राहिला. त्याने शतक झळकावत दिवसअखेर नाबाद 137 धावा ठोकल्या. त्याला सारांश जैन (नाबाद 47) सुरेख साथ देत असून दोघांनी सहाव्या विकेटसाठी अभेद्य 118 धावांची भागीदारी केली आहे. मध्य विभागाचे फलंदाज दमदार खेळ करत असताना दक्षिण विभागाच्या गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. गुरजपनीत सिंगने तीन विकेट घेतले, तर वासुकी काwशिक आणि एम. डी. निधीष यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.