
>> प्रा. पूजा कुलकर्णी
‘अंतरझरा ‘हा कवी सुभाष शिंदे यांनी लिहिलेला कविता संग्र. सुबक मांडणी असलेल्या या काव्यसंग्रहाला कवी, गीतकार प्रशांत मोरे यांची मिळालेली सुंदर प्रस्तावना आणि मनोवेधक पाठराखण हे देखील एक अनोखे दर्शन देऊन जाते. वाचकाच्या मनाची पकड घेण्यात हा काव्यसंग्र यशस्वी झाला आहे. कवी सुभाष शिंदे हे एक सर्जनशील लेखक, कवी, प्राध्यापक असून विविध विषयांवर त्यांनी लिलेल्या कविता काळजाचा वेध घेणाऱ्या आहेत
‘अंतरझरा’ हा त्यांच्या कवितांचा पहिलाच संग्र असूनही सगळ्याच कविता अतिशय दर्जेदार आहेत. संग्रहातील कविता वाचताना चटकन लक्षात येतं ते कवीचं संवेदनशील मन, त्यांच्यातली प्रतिभा, सर्जनशीलता. ह्या वेगवेगळ्या कविता कुठल्याही एकाच विषयावर आधारित नाहीत. संपूर्ण कवितासंग्र म्हणजे मानवी भावभावनांचा कल्लोळ आहे. प्रत्येक कविता आशयपूर्ण असून वाचकाला विचार करायला भाग पाडणारी आहे.
मनात घर करुन बसलेल्या अनेकविध भावना कवीने विविध कवितांच्या स्वरुपात व्यक्त केल्या आहेत आणि म्हणूनच ह्या सर्व कविता खूप जवळच्या वाटतात. कवीमनाच्या व्यक्ती नेमीच जास्त संवेदनशील असतात. वरवर साध्या सोप्या वाटण्राया गोष्टी,प्रसंग, घटनांकडे बघण्याचा वेगळाच निसर्गदत्त दृष्टीकोन त्यांना लाभलेला असतो. याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवतो. ह्या कवितासंग्रहात गझल सदृश्य कविता, प्रेम, विर, हास्य, विडंबन, सामाजिक कविता, जल यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे व्यक्त होण्यासाठी भाषेचं बंधन नसतं हेच ह्यातून सिध्द होतं.
‘प्रश्न’ या कवितेतून व्यक्त होताना कवी म्हणतात, माणसाचे ल्ली हे असे होत चालले
स्वतकडून स्वतचे फसे होत चालले
मोबाईलने साधती अदृश्य संवाद
आठवांचे पुसटसे ठसे होत चालले
ह्या ओळी अंतर्मनाचा ठाव घेतात किंबहुना साऱ्यांचेच मनोगत व्यक्त करतात. आजकालच्या सोशल मीडियाच्या प्रभावाने आपापसातील संवाद रवत चालला आहे. त्यामुळे प्रचंड गर्दीतही प्रत्येकजण एकटाच भासतो. सारे आयुष्य आभासी सुखामागे धावल्याने दमछाक झाल्याने आपण स्वतलाच रवून बसतो हे सत्य आणि वास्तव वरील ओळींमधून अधोरेखित होते.
‘विहार’ ही देखील एक मनाला भिडणारी कविता आहे
करून घे विहार पाखरा आहेत जोवर पंख
काय भरवसा नियतीचा मारेल कधी डंख
माणसाने मनसोक्त जीवन जगून घ्यावे, जीवन अनमोल असले तरी ते क्षणभंगुर आहे, उगाचच हाव न करता जीवनातील मिळणाऱ्या गोष्टींचा मनमुरादपणे आनंद घ्यावा हे अचूकपणे ही कविता सांगूंन जाते
रवत चाललेल्या इमानावर कवी लिहितात,
कमाल नसले तरी किमान वे
पण माणसात मात्र इमान वे
कायद्याच्या अंमलबजावणीत
नियम सर्वांसाठी समान वे
अति तिथे होत असते माती
प्रत्येक गोष्टीला एक प्रमाण वे
सध्या इमानदारीने वागण्यारी माणसे अभावानेच सापडतात त्याचबरोबर कायदा तोडणारी लोकं देखील प्रचंड प्रमाणात सापडतात आणि काही गोष्टींचा अतिरेक केल्याने आयुष्य उध्वस्त होतं या स्राया गोष्टी या गझलसदृश कवितेतून तंतोतंत मांडल्या आहेत
आईबापाची कृतज्ञता व्यक्त करताना केलेले वर्णन
आई सांभाळ करते होत पावलांची भुई
बाप होतोय सावली घेत आभाळाच डोई
अजून एका कवितेत आपण समाजाचं देणं लागतो आणि हे संस्कार आपल्या पित्याकडून आपल्याला लाभले आहेत त्यांची समर्पक शब्दात मांडणी केली आहे.
बाप म्हणायचा खूप खूप मोठा हो
नदीचा रस्ता बदलवणार गोटा हो
नेहेमी फायद्याचंच नको रे बघू
कुणाला तरी सुखावणारा तोटा हो
त्याचबरोबर एकाहून एक अशा अफलातून प्रेमकवितांचा खजिना या संग्रहातून लुटायला मिळतो. विनोदी हास्यकवितांची मेजवानी अनुभवताना खळखळून सू येते.
झालीत कारटी टवाळ आता
करती भलते सवाल आता
म्हणे आम्हाला कसे ओरडता
आई पुढे का मवाळ आता
प्रेम, हास्य, वेदना, संवेदना या अनुभूतीने संपन्न ‘अंतरझरा’ हा काव्यसंग्र आकर्षक पध्दतीने सजवला आहे. पुस्तकाची बांधणी, अक्षरांचा आकार खूप मनोवेधक आहे. संग्रहातील प्रत्येक कविता मनाचा वेध घेत पुढे सरकते . मानवी मनाच्या विविध कंग्रोयाना स्पर्शून जाण्राया भावना तरलप्रेम, निसर्ग यांच्या अंतर्भाव असणारा कविता हेच ह्या काव्यसंग्रहाचं यश आहे.
कवी : सुभाष शिंदे
प्रकाशक : सई प्रकाशन
पृष्ठे : 100 मूल्य : 200 रुपये
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)