…तेव्हा पंतप्रधान मोदी गप्प का राहिले?  मोदींच्या मणिपूर भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मणिपूरला भेट दिली. या भेटीत पंतप्रधानांनी मणिपूर हा देशाच्या मुकुटातील रत्न असल्याचे गौरवाद्गार काढले. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. त्यांचे हे गौरवद्गावर म्हणजे क्रूट थट्टा असल्याची टीका करताना हिंसाचाराच्या काळात मोदींनी मणिपूरला भेट का दिली नाही? ते इतर राज्यांमध्ये प्रचारात व्यस्त का होते? असा संतप्त सवाल आंबेडकर यांनी केला.

आंबेडकर यांनी सात प्रश्न उपस्थित करीत मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकरांनी माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ख्रिश्चन कुकी समाजावर अन्याय केल्याचे सांगितले. तसेच लीक झालेल्या ऑडिओ टेप्समध्ये बिरेन सिंग हेच हिंसाचाराचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले. जर मणिपूर ‘रत्न’ असेल तर बिरेन सिंग सरकारने ख्रिश्चन कुकी समाजाचे जातीय शुद्धीकरण का केले? असा सवाल आंबेडकर यांनी केला.