Income Tax Return भरण्याची मुदत पुन्हा वाढली? आयकर विभागाकडून अधिसूचना जारी

आयकर विभागाकडून कर निर्धारण वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख वाढविण्यात आली आहे, असा मॅसेज सध्या फॉरव्हर्ड होतोय. जर हा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान. कारण आयकर विभागाकडून अशी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. ग्राहकांनी  या फसव्या अफवेला बळी पडू नये, यासाठी आयकर विभागाने निवेदन जारी केले आहे.

आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 वरून 30 सप्टेंबर केली असल्याचा मॅसेज सध्या प्रचंड व्हायरल होतेय. व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरणारा हा मॅसेज ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे आढळून आलेय. त्यामुळे आयकर विभागाने निवेदन जारी करून त्यात (ITR) भरण्याची शेवटची तारीख सोमवार, 15 सप्टेंबर आहे, असे स्पष्ट केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मॅसेजवर अर्थ मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 वरून वाढवून 15 सप्टेंबर 2025 करण्यात आली. यानंतर कोणताही अधिकृत आदेश किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. करदात्यांना सावध करण्यासाठी आयकर विभागाने निवेदन जारी केले आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. करदात्यांना फक्त अधिकृत @IncomeTaxIndia या अकाऊंटवर अधिकृत बातम्या मिळतील, असा सल्ला देण्यात येत आहे.