Mohammed Siraj – ओव्हलचं मैदान गाजवलं आणि मियां भाईने पटकावला ICC चा विशेष पुरस्कार

Asia Cup 2025 ला टीम इंडियाने शाही थाटात सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात दुबळ्या UAE चा पराभव केल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात पाकड्यांची नांगी ठेचलीत. आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची ICC ने ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम पुरूष खेळाडू म्हणून निवड केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर ओव्हल कसोटीमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे त्याला त्याला सन्मानित करण्यात आलं आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या दौऱ्यामध्ये मोहम्मद सिराजने घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करत सर्वांचीच मन जिंकली. विशेष करून ऑगस्टमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीमध्ये त्याने सर्वांनाच प्रभावित केलं. चौथ्या डावात इंग्लंडला जिंकण्यासाठी 374 धावांच आव्हान टीम इंडियाने दिलं होतं. आव्हानाचा पाठलाग करताना सामना टीम इंडियाच्या हातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु मोहम्मद सिराजने इंग्लंडचा डाव उधळून लावला आणि 5 विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाने अवघ्या 6 धावांनी हा सामना जिंकला आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. याच सामन्यात त्याने पहिल्या डावात सुद्धा चार विकेट घेतल्या होत्या. ओव्हल कसोटीमध्ये त्याने एकून 46.3 षटके गोलंदाजी केली होती. इंग्लंड दौऱ्यात सर्व पाच सामने खेळणारा तो एकमेव गोलंदाज होता. तसेच त्याने या मालिकेत सर्वाधिक 23 विकेट घेतल्या होत्या. याचा फायदा त्याला ICC क्रमवारीतही झाला.

सर्वोत्तम पुरुष खेळाडूंच्या शर्यातीत मोहम्मद सिराज व्यतिरिक्त न्यूझीलंडचा मॅट हॅनरी आणि वेस्ट इंडिजचा जेडन सील्स या खेळाडूंचा समावेश होता. परंतु मोहम्मद सिराज बाजी मारण्याच यशस्वी ठरला. पुरस्कार मिळाल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला की, “मला अभिमान आहे की मी संघासाठी महत्त्वाचा स्पेल विशेषत: महत्त्वाच्या क्षणी टाकू शकलो. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या अव्वल संघाविरुद्ध आणि दर्जेजार फलंदाजीविरुद्ध गोलंदाजी करणे सोपे नव्हते. परंतु यामुळेच मला माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली.” असं मोहम्मद सिराज म्हणाला आहे.