
Asia Cup 2025 मध्ये साखळी फेरीतील पहिले दोन्ही सामने गमावलेल्या UAE आणि Oman यांच्यामध्ये शेख झायद स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर ओमानने UAE ला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. याचा UAE ने चांगलाच फायदा घेतला आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा चोपून काढल्या. प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना ओमानची गाडी रुळावरून घसरली आहे.
प्रथम फलंदाजी करताना सलामीला आलेल्या कर्णधार मोहम्मद वसीम आणि अलीशान शराफू यांनी विस्फोटक अंदाजात आपल्या डावाला सुरुवात केली. अलीशान शराफूने 38 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार मारत 51 धावा केल्या. तर मोहम्मद वसीमने 54 चेंडूंचा सामना 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 69 धावांची वादळी खेळी केली. या दोघांनी केलेल्या विस्फोटक सुरुवातीमुळे UAE ची गाडी सुसाट सुटली, मात्र त्यानंतर इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाला 5 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आलं. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये UAE आणि OMAN चा पराभव झाल्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. प्रत्तुत्तरात ओमानने 5 षटकांच्या समाप्तीनतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा केल्या आहेत.