चीनशी मांडवलीचे अमेरिकेचे संकेत

चीनवर शंभर टक्क्यांहून अधिक टॅरिफ लावणारे, पण अंमलबजावणी वारंवार पुढे ढकलणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आता आणखी वरमले आहेत. त्यांनी चीनशी मांडवलीचे संकेत दिले आहेत. चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकला अमेरिकेत पुन्हा एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे.

अमेरिका व चीनमध्ये व्यापार कराराच्या संदर्भात माद्रिद येथे सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक खूपच चांगली झाली. लवकरच यातील निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकी तरुणाईला हव्या असलेल्या एका कंपनीच्या बाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली. असेही ट्रम्प यांनी सांगितले.