
झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये सात फुटांचा लांबलचक काळा साप आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये साप दिसून आला. कॉलेजमधील एका सफाई कर्मचाऱ्याला हा साप दिसला. त्यानंतर तो ओरडून सैरावैरा पळू लागला. याबाबत माहिती मिळताच ओटीमधील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ऑपरेशन थिएटरचे प्रमुख कनक श्रीवास्तव यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी सापाला सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडले. सर्पमित्रालाही या सापाला पकडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. अखेर एक तासाच्या प्रयत्नानंतर सापाला पकडण्यात यश आले. pinewz_official या अकाऊंटवरून सापाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तो व्हायरल होतोय.